Om संघर्ष साधना
ही एक सत्य कथा असून फक्त या कथेतील पात्रांची नावे बदलली आहेत . आज ही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजातही स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण केले जाते वरून सुशिक्षित असणारा हा समाज आतून मात्र स्त्रियांच्या अस्तित्वालाच पोखरत असतो स्त्री ही कमवणारी असली काय किंवा न कमवणारी असली काय प्रत्येक स्त्रीला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास सहन करावाच लागतो अशाच एका सुशिक्षित कुटुंबात लग्न करून गेलेली साधना ही कथानायिका उच्चशिक्षित असून नोकरी करणारी आहे तरीही तिला आणि तिच्या नवऱ्याला मिळणारे उत्पन्न हे तिच्या दिराच्या व त्यांच्या पत्नी च्या मानाने कमी असल्यामुळे तिला जे काही सहन करावे लागले त्याचे यथोचित वर्णन या कथेत केलेले आहे आज आपण स्वतंत्र आहोत खूप प्रगती केली आहे असे वाटत असेल तरी स्त्रियांची परिस्थिती मात्र बदलेली नाही आणि म्हटले जाते की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्री ची शत्रू असते हे खरे आहे
Vis mer